स्वागत आहे
संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत!
माझ्या आयुष्याच्या प्रवासातील विविध आठवणी, संघर्ष, सामाजिक व संघटनात्मक कार्य तसेच प्रेरणादायी प्रसंग यांची गुंफण करणारे 'जीवन तरंग' हे माझे आत्मचरित्र १२ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाले. कोविडच्या काळात मिळालेल्या निवांत वेळेमुळे आयुष्याच्या वाटचालीकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहण्याची आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली. त्या आठवणी, अनुभव आणि भावभावना शब्दबद्ध होत गेल्या आणि त्यातून 'जीवन तरंग' या आत्मचरित्राचा जन्म झाला. हे केवळ पुस्तक नसून, माझ्या आयुष्याच्या अनुभवांचे आणि भावनांचे एक भावरूपी शब्दपुष्प आहे.
पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आलो आणि त्यानंतर लगेचच, १५ ऑगस्ट १९७५ रोजी पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या वार्षिक सभेत माझी माझ्या ध्यानीमनीही नसताना गावच्या इरिगेशन स्कीमचे 'अंतर्गत हिशेब तपासणीस' म्हणून निवड झाली. याच निमित्ताने माझे सामाजिक क्षेत्रात पदार्पण झाले. या घटनेला आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी, भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या मंगलदिनाचे औचित्य साधून हे संकेतस्थळ आपल्या सर्वांसाठी खुले करताना मला मनापासून आनंद होत आहे.
आपण या संकेतस्थळाला आवर्जून भेट द्यावी आणि आपल्या प्रतिक्रिया, सूचना व शुभेच्छा व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे जरूर कळवाव्यात, ही नम्र विनंती.
– बाळासाहेब शिंत्रे
अधिक जाणून घ्या →
🕰️ जीवनातील महत्त्वाचे टप्पे → संपूर्ण प्रवास
⚔️ आव्हाने आणि संघर्ष
- मुंबईत स्थलांतर करून शून्यातून कारकीर्द उभारणे
- नोकरी आणि समाजकार्य यांचा समतोल राखणे
- विविध संस्थांमध्ये आर्थिक पारदर्शकता आणि विश्वास टिकवणे
- अनेक वर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाला गती देणे
- ग्रामीण आणि शहरी समाजामध्ये मजबूत सामाजिक बंध निर्माण करणे
- शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी लोकसहभाग उभारणे
🏅 प्रमुख उपलब्धी
- RCF अधिकारी संघटना व सामाजिक संस्थांमध्ये नेतृत्व
- शुभम को-ऑप. हाऊसिंग सोसायटी पुनर्विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान
- वैदिक विश्व ट्रस्टमध्ये दीर्घकालीन खजिनदार म्हणून सेवा
- आजरा बँक शाखा नवी मुंबईमध्ये आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न
- दोन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी लोकसहभागातून निधी उभारणी
- श्रम साफल्य पतसंस्थेची स्थापना व दीर्घकालीन नेतृत्व
📸 आठवणींचे क्षण
आर.सी.एफ. मध्ये रुजू होताना- स्वप्नांना पंख देणारा दिवस-१६ एप्रिल १९७७.
सौ रंजना सोबत विवाह सोहळा १९८२
१५ एप्रिल २००९ - हर्षदा आणि सुदर्शन यांचा लग्न सोहळा
८ जून २०१४ मिलिंद आणि रसिका यांचा लग्न सोहळा
शिव सहकार सेनेची सेना भवन येथे जिल्हास्तरीय बैठक
अकोला येथे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी धान्य वाटप व युवासेनेचा महामेळावा – श्री. खासदार अरविंद सावंत व इतरांसोबत संपर्क प्रमुख बाळासाहेब.📖 जीवन तरंग प्रकाशन- क्षणचित्रे
‘जीवन तरंग’ या आत्मचरित्राला पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचा शब्दरूपी आशीर्वाद म्हणजे साक्षात सरस्वतीने माझ्या झोळीत टाकलेले 'अक्षरदान.'
या महाराष्ट्राच्या माई आणि अनाथांच्या आई यांच्या पवित्र आशीर्वादाने पावन झालेल्या ‘जीवन तरंग’ या शब्दपुष्पाचा प्रकाशन सोहळा दिनांक : १२ डिसेंबर २०२१ रोजी गुरव ज्ञाती हॉल, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न. आयुष्याच्या विविध तरंगांना शब्दरूप देणारा हा अविस्मरणीय आणि भावस्पर्शी क्षण.
"या क्षणांनी माझ्या आयुष्याला एक वेगळाच आयाम दिला."
सर्व क्षणचित्रे पाहा →
ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रवीण दवणे साहेब यांच्या शुभहस्ते ‘जीवन तरंग’चे प्रकाशन – दि. १२ डिसेंबर २०२१
कुटुंब – आयुष्याचा आधार
कुटुंब म्हणजे आयुष्याची खरी ताकद, आधार आणि आनंदाचा अखंड स्रोत. प्रत्येक यशस्वी व्यक्तिमत्त्वामागे कुटुंबाचा भक्कम आधार, प्रेम आणि त्याग. सौ. रंजना शिंत्रे यांच्या सहवासाने माझ्या जीवनप्रवासाला प्रेम, साथ आणि स्थैर्य.
मुलगा मिलिंद, सून रसिका आणि नातू रिधान, तसेच मुलगी हर्षदा, जावई सुदर्शन आणि नातवंडे नित्या व नैतिक यांच्या प्रेमाने जीवन आनंदमय. माझे ज्येष्ठ बंधू बाबूदादा आणि अर्जुनदादा तसेच त्यांच्या परिवाराच्या प्रेमळ सहवासात जीवनातील अनेक सुखद क्षणांचा अनुभव. या सर्वांच्या प्रेमात, आपुलकीत आणि सहवासातच जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद. आमच्या कुटुंबाची जडणघडण करताना आजी तुळसाबाई, वडील वाकोजी, आई राजूबाई आणि दादा बाबू यांनी घेतलेले कष्ट, केलेला त्याग आणि दिलेले संस्कार कधीही विसरणं अशक्य. आमच्या ‘माझं कुटुंब’ (My Family Group) तर्फे या सर्व दिवंगत आप्तांना भावपूर्ण आदरांजली! त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
"कुटुंब म्हणजे आयुष्याची शिदोरी – प्रेमाची साथ – आनंदाचा ठेवा".
संपूर्ण कुटुंब पाहा →
तीन पिढ्यांचा सुंदर संगम – संपूर्ण कुटुंब
🤝 आयुष्यात लाभलेली "चौकडी"
बालपणापासून निवृत्तीपर्यंत विविध टप्प्यांवर लाभलेल्या जिवाभावाच्या मैत्रीच्या चौकड्यांचा हृदयस्पर्शी प्रवास — अनोखे योगायोग आणि अमूल्य नाती.
विशेष चौकड्यांचा उल्लेख
शालेय चौकडी – यशाची सुरुवात : १९६७ साली सातवीत १००% निकालाची ऐतिहासिक कामगिरी. महाविद्यालयीन चौकडी – संघर्षातील आधार : १९७१-७५ या लेबर स्कीमच्या संघर्षमय काळातील भक्कम साथ आणि डी.जी. कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथे पहिल्या बॅचमध्ये पदवी मिळवण्याचा मान. नोकरीतील चौकडी – मैत्रीची शिदोरी : १९७७ पासूनच्या ३८ वर्षांच्या एफ.सी.आय./आर.सी.एफ. प्रवासातील सहकार्य व मैत्री. कुटुंबाची चौकडी – जीवनाचा आधार : १९८२ पासून पत्नी, मुले यांच्या सहवासाने संसाराचा चौकोन पूर्ण. पुढे सून, जावई, व नातवंडांमुळे आनंद अधिक समृद्ध. सामाजिक चौकडी – एकजुटीचे बळ : २०२२ पासून सी-२ टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन परावर्तित शुभम हाउसिंग सोसायटीच्या माध्यमातून विश्वास, समन्वय व सामूहिक प्रयत्नांतून वाशी, नवी मुंबई येथील २१ वर्षे रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश.
"आयुष्यातील खरी श्रीमंती ही आयुष्यभर जपलेल्या जिवाभावाच्या माणसांमध्ये असते."
चौकडी वाचा →
सातवीच्या वर्गात लाभलेली पहिली चौकडी आणि वर्गशिक्षक परीट गुरुजी
📖 जीवन तरंग – आत्मचरित्र
"आठवणींच्या धाग्यांनी विणलेला जीवन प्रवास"
आतापर्यंत पैशांचा हिशोब केला, आता आठवणींचा हिशोब जुळवला. हे पुस्तक म्हणजे फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे, तर युवा पिढीला दिशा देणारे आहे.
प्रकाशन: प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते.
"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे." – कवी मंगेश पाडगावकर